![]() |
Lek Ladki Yojna : महाराष्ट्र लेक लाडकी योजना |
Lek Ladki Yojana लेक लाडकी योजना:- ही महाराष्ट्र सरकारची एक
कल्याणकारी योजना आहे. या योजनेचा उद्देश
मुलींच्या शिक्षण आणि संगोपनाला प्रोत्साहन देणे हा आहे. या योजनेमुळे मुली स्वावलंबी आणि सक्षम बनतील.
लेक लाडकी योजनेची वैशिष्ट्ये:
या योजनेतून गरीब कुटुंबातील मुलींना मदत मिळेल
या योजनेतून मुलींना आर्थिक मदत मिळेल.
या योजनेतून मुलींचे संगोपन आणि शिक्षणाला
प्रोत्साहन मिळेल.
या योजनेतून मुली स्वावलंबी आणि सक्षम बनतील .
लेक लाडकी योजनेची पात्रता :
१) Lek Ladki Yojana ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये दिनांक १ एप्रिल, २०२३ रोजी वा त्यानंतर जन्माला येणा-या एक अथवा दोन मुलींना लागू राहील. तसेच, एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील.
२) पहिल्या अपत्याच्या तिस-या हप्त्यासाठी व दुस-या अपत्याच्या दुस-या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता/पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.
३) तसेच, दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. मात्र त्यानंतर माता / पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
४) दिनांक १ एप्रिल, २०२३ पूर्वी एक मुलगी / मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना (स्वतंत्र) ही योजना अनुज्ञेय राहील. मात्र माता / पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
५) लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक राहील.
६) लाभार्थी बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे.
७) लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु. १ लक्ष पेक्षा जास्त नसावे.
आवश्यक कागदपत्रेः-
१) लाभार्थीचा जन्माचा दाखला
२) कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न १ लाखपेक्षा जास्त नसावे.) याबाबत तहसिलदार / सक्षम अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील.
३) लाभार्थीचे आधार कार्ड (प्रथम लाभावेळी ही अट शिथील राहील)
४) पालकाचे आधार कार्ड
५) बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
६) रेशनकार्ड (पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड साक्षांकित प्रत)
७) मतदान ओळखपत्र (शेवटच्या लाभाकरिता १८ वर्ष पूर्ण झाल्यांनतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला)
८) संबधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला (Bonafied)
९) कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र (“अ” येथील अटी शर्तीमधील क्रमांक २ येथील अटीनुसार)
१०) अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील, (अविवाहीत असल्याबाबत लाभार्थीचे स्वयं घोषणापत्र).
अर्ज
करण्याची पद्धत:
लेक लाडकी (Lek Ladki Yojana) योजनेच्या लाभार्थीची पात्रता पडताळणी करण्याची जबाबदारी ही अंगणवाडी सेविका, संबंधित पर्यवेक्षिका / मुख्यसेविका यांची राहील.
अंगणवाडी सेविका / पर्यवेक्षिका / मुख्यसेविका यांनी लाभार्थी पात्रतेची खातरजमा करुन ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्याचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा. सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे.
त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका / पर्यवेक्षिका / मुख्यसेविका व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदा-या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत असून त्यामध्ये आवश्यकतेनुसार आयुक्तालय स्तरावरून सुधारणा करण्यात येतील
मुलींना नेमका काय लाभ मिळणार? (Lek Ladki Yojana Benifits):-
पात्र लाभार्थ्यांना लेक लाडकी योजनेंतर्गत वेगवेगळ्या टप्प्यांवर खाली नमूद केलेली आर्थिक मदत दिली जाईल.
मुलीच्या जन्मानंतर सरकारकडून ५००० रुपयांची मदत.
मुलीने इयत्ता पाहिलीत प्रवेश करताच ६००० हजार रुपयांची मदत.
मुलगी इयत्ता सहावीत प्रवेश करताच ७००० हजार
रुपयांची मदत
मुलीने अकरावीत प्रवेश घेताच ८००० हजारची आर्थिक
मदत.
मुलीला १८ वर्ष पूर्ण होताच तिला ७५००० हजाराची आर्थिक मदत सरकारच्या वतीने केली जाते.
लेक लाडकी योजनेचे प्रमुख उद्दिष्टे | LekLadki Yojana
वित्तीय सहाय्य: या
योजनेअंतर्गत, मुलीला तिच्या जन्मापासून ते 18 वर्षे वयापर्यंत विविध टप्प्यांवर आर्थिक मदत दिली जाते.
- जन्माच्या
वेळी: ₹5,000
- 1ली इयत्ता: ₹4,000
- 6वी इयत्ता: ₹6,000
- 11वी इयत्ता: ₹8,000
- 18
वर्षे पूर्ण झाल्यावर: ₹75,000
शिक्षण:
लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलींना शिक्षणात प्रोत्साहन देणे या
योजनेमुळे मुलीचे शिक्षण सुरक्षित होते व त्यांना उच्च शिक्षणाच्या संधी मिळते
ज्यामुळे महिलांच्या साक्षरतेत वाढ होते.
आरोग्य व पोषण:
या योजनेमुळे मुलींना आर्थिक मदतीमुळे त्यांच्या आरोग्य व पोषणाकडे
अधिक लक्ष देणे शक्य होते जे त्यांचे मानसिक व शारीरिक विकासासाठी महत्त्वाचे आहे.
सामाजिक आणि सांस्कृतिक:
मुलींच्या जन्मदरात वाढ करणे तसेच समाजात मुलीची स्थिती सुधारण्यास
योजना मदत करते .18 वर्षापर्यंत आर्थिक मदत मुलींना
त्यांच्या भविष्यातील शिक्षणासाठी किंवा व्यवसायासाठी एक पाया देऊ शकते त्यांना
स्वयंपूर्ण बनवण्यास मदत करते.
योजनेच्या
अटी आणि शर्ती काय आहेत? (Lek Ladki Yojana Rules And
Conditions)
ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील.
तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील. पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हफ्त्यासाठी व दुसऱ्या आपत्याच्या दुसऱ्या हफ्त्यासाठी अर्ज सादर करताना माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.
दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी आपत्ये जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनचा लाभ मिळेल. मात्र त्यानंतर मात्या किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी किंवा मुलगा आहे आणि त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना ही योजना अनुज्ञेय राहील. मात्र माता-पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक राहील. लाभार्थीचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही. कृपया याला official वेबसाईट म्हणून माणू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किव्हा आधार क्रमांक किवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती टाकू नका आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबधित तक्रारी, योजनेबद्दल क्वेरी किवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधित विभागाच्या official संकेतस्थळावर किवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो .धन्यवाद !