HSRP नंबर प्लेट बसवणं आता आणखी सोपं! किती रुपये खर्च? कधी मिळणार? कशी करणार नोंदणी? जाणून घ्या डिटेल्स

 

HSRP : ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ म्हणजे काय? जाणून घ्या त्याचे फायदे?
HSRP : ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ म्हणजे काय? जाणून घ्या त्याचे फायदे?

High-Security Number Plateदेशातील सर्व प्रकारच्या वाहनावर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP)लावणे बंधनकारक आहे. पण तरीही अनेक जण या नियमाकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसते. अशा प्रकारचे नंबर प्लेट लावल्याने आपली वाहन सुरक्षित होते. पोलिसाकडून दंड होण्यापासून वाचू शकता .जाणून घेऊया काय आहे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट म्हणजे काय आणि त्याचे फायदे या विषयी...

HSRP  नंबर कधीपर्यंत मिळणार?

HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी ३१ मार्च २०२५  ३० जून २०२५ ही डेडलाईन आहे. यासाठी केवळ काही दिवसांचा 

कालावधीच शिल्लक आहे आणि नोंदणीसाठी गर्दी होत आहे. त्यामुळं वेटिंग पिरियड हा ३० दिवसांवर पोहोचला 

आहे. हाच कालावधी ८ ते १० दिवसांवर आणण्याच्या दृष्टीनं पुणे आरटीओकडून नव्यानं ५५ केंद्रांना अधिकृत 

मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळं आता वाहनधारकांना नोंदणी केल्यानंतर आठ दिवसांत HSRP नंबर प्लेट लावून मिळणार आहे.

 HSRP नंबर प्लेटचे फायदे काय?

HSRP नंबर प्लेट्स अशा पद्धतीनं बनवलेल्या असतात ज्यामध्ये कोणाला बदल करता येत नाही. बनावट पाटी बनवणं कठीण आहे. त्यामुळं वाहन चोरीपासून प्रतिबंध होतो.

HSRP नंबर प्लेट्स चोरीची वाहनं आणि बनावट नंबर प्लेट्स ओळखण्यात मदत करतात. त्यामुळं फसवणूक टाळता येते.

HSRP नंबर प्लेट्समुळं अपघाताला कारणीभूत ठरलेलं वाहनं आणि वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणारं वाहनं ओळखण्यास मदत होते.

HSRP नंबर प्लेट्सची इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं नोंदणी होते आणि तुमच्या वाहनाशी जोडल्या जातात. त्यामुळं वाहन कोणाच्या मालकीचं आहे हे लगेच शोधता येतं.

ही नंबर प्लेट तुम्हाला घरी बसवता येत नाही, कारण याला नट बोल्टचं फिटिंगला परवानगी नाही.

HSRP नंबर प्लेटची वैशिष्ट्ये?

होलोग्राम : अशोक चक्राची प्रतिमा असलेला हॉट-स्टॅम्प केलेला क्रोमियम-आधारित होलोग्राम

लेसर-एच्ड पिन: लेसर तंत्रज्ञान वापरून कायमस्वरूपी ओळख क्रमांक (पिन) कोरला जातो.

छेडछाड-प्रूफ स्नॅप लॉक : नंबर प्लेट बसवताना पुन्हा वापरता न येणारा रिबीट लॉक वापरला ज्यामुळं 

नंबर प्लेट कोणालाही काढता येत नाही, फक्त लॉक तोडूनच ती काढली जाऊ शकते.

रिफ्लेक्टीव्ह शीटिंग: नंबर प्लेटवर रिफ्लेक्टीव्ह शीटिंग वापरण्यात आल्यानं अंधारातही तुमच्या वाहनाची नंबर प्लेट चमकते.

हाय सिक्युरिटी नंबर प्लेट साठी किती खर्च येतो?

दुचाकींसाठी...

नंबर प्लेटची मूळ किंमत ४०५ रुपये

फटमेंट चार्जेस - ४५.०० रुपये

होम डिलिव्हरी - १२५.०० रुपये

एकूण किंमत - ५७५.०० रुपये

१८ टक्के जीएसटी - १०३.५० रुपये

अंतिम किंमत - ६७८.५० रुपये

 तीन चाकींसाठी...

नंबर प्लेटची मूळ किंमत ४५५ रुपये

फटमेंट चार्जेस - ४५.०० रुपये

होम डिलिव्हरी - १२५.०० रुपये

एकूण किंमत - ६२५.०० रुपये

१८ टक्के जीएसटी - ११२.५० रुपये

 अंतिम किंमत - ७३७.५० रुपये

 चार चाकी व जड वाहनांसाठी....

नंबर प्लेटची मूळ किंमत ७०० रुपये

फटमेंट चार्जेस - ४५.०० रुपये

होम डिलिव्हरी - १२५.०० रुपये

एकूण किंमत - ८७०.०० रुपये

१८ टक्के जीएसटी - १५६.६० रुपये

अंतिम किंमत - १०२६.६० रुपये


सर्व वाहनांना एचएसआरपी बंधनकारक 

एप्रिल 2019 नंतर बाजारात येणाऱ्या सर्व वाहनांना ती अनिवार्य आहे तसेच आता 2019 पूर्वीच्या वाहनांना एच एस 

आर पी बंधनकारक करण्यात आले आहेत काही महिन्यापूर्वीच हा निर्णय झाला असून त्यासाठी ३० जून  ची मुदत 

देण्यात आले आहे त्यासाठी राज्यभरात तीन खाजगी एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे नागरिकांना 

ऑनलाइन प्रक्रिया करून तसेच आपल्या शहरातील असलेले अधिकृत केंद्रामध्ये ती बसून घेता येणार आहे

Post a Comment

0 Comments