महाराष्ट्रात काय स्वस्त अन् काय महाग, यंदाच्या बजेटमध्ये काय खास?, वाचा सविस्तर..

Maharashtra Budget 2025 : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget Session 2025) सादर केला. अर्थसंकल्पीय भाषणात त्यांनी विविध क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा केल्या.काही नवीन योजना सुद्धा सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. यंदाच्या अर्थसंकल्पात झालेल्या घोषणांनुसार काय स्वस्त झालंय आणि काय महाग झालं याची सविस्तर माहिती घेऊया..

 
Maharashtra-Budget -2025

 Maharashtra Budget Session 2025| महाराष्ट्र बजेट 


चारचाकी वाहनांचा टॅक्स अन् किंमतीही वाढणार

अर्थमंत्री अजित पवार म्हणाले, 30 लाखांपेक्षा जास्त किंमती ज्या वाहनांच्या आहेत अशा वाहनांवर 6 टक्के दराने मोटार वाहन कर आकारण्याचे प्रस्तावित आहे. तसेच या कराच्या कमाल मर्यादेत 20 लाखांहून 30 लाखांपर्यंत वाढ करण्याचा निर्य घेण्यात आला आहे. वाहन कराच्या मर्यादेत वाढ करण्याच्या या निर्णयामुळे राज्य सरकारच्या तिजोरीत अतिरिक्त उत्पन्न जमा होण्याची अपेक्षा आहे. यामुळे जवळपास 170 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळेल अशी शक्यता आहे.

रेशन दुकानात पॉस मशिन

राज्यातील 52 हजार 500 रास्त भाव दुकानांमधील -पॉस मशिन इलेक्ट्रॉनिक वजनकाटयांना जोडण्यात येत आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सप्लाय चेन - ब्लॉक चेन तंत्रज्ञान वापरुन स्वस्त धान्याची वाहतूक वितरण प्रणाली अधिक पारदर्शक कार्यक्षम करण्यात येणार आहे.

Maharashtra |अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी काय

प्रधानमंत्री आवास योजना, शहरी- 1 साठी 8 हजार 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

नाविन्यपूर्ण बांधकाम, तंत्रज्ञानाचा वापर, हरित इमारती तसेच सौर प्रणालीच्या वापरासाठी अधिकचे अनुदान देण्यात येणार आहे.महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये नागरिकांना मोठा दिला मिळालेला आहे. येत्या पाच वर्षामध्ये राज्यातील वीजदर कमी होणार

या सर्व घरकुलांच्या छतावर सौर उर्जा संच बसविण्यात येणार आहेत.

महावितरण कंपनीने येत्या 5 वर्षांसाठी वीजेचे दर निश्चित करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे सादर.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 साठी राज्य शासनाकडून या योजनेच्या अनुदानात 50 हजार रुपयांची वाढ करण्यात येणार आहे.

पुण्याच्या दोन मेट्रो मार्गांचा प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला.

औद्योगिक धोरण 2025 लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.


Maharashtra |अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा कोणत्या ?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 36 हजार कोटी रुपयांची तरतूद

चालू वर्षात आणखी 24 लाख महिलांना लखपती दिदी करणार.

महिला बचतगटांसाठी प्रत्येक जिल्ह्यात उमेद मॉल सुरू करणार. पहिल्या टप्प्यात दहा जिल्ह्यांत मॉलचे बांधकाम होणार

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा २१ जिल्ह्यांतील हजार २०१ गावांमध्ये राबविण्यात येणार

या प्रकल्पासाठी सन 2025-26 मध्ये 351 कोटी 42 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

दरर्षी 3 ऑक्टोबर या दिवशी अभिजात मराठी भाषा सन्मान दिन साजरा करण्यात येणार

चालू वर्षात आणखी 24 लाख महिलांना लखपती दिदी करणार.

कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुध्दीमत्ता अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचे धोरण आखणार.

आगामी दोन वर्षांत त्यासाठी 500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार.

या प्रकल्पासाठी सन 2025-26 मध्ये 351 कोटी 42 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Maharashtra Budge |मुद्रांक शुल्कात वाढीचा प्रस्ताव

महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अधिनियम कलम 4 नुसार एकाच व्यवहारासाठी एका पेक्षा जास्त कागदपत्रांचा वापर केला तर पुस्तक दस्तऐवजांना 100 ऐवजी 500 रुपये इतके मुद्रांक शुल्क आकारण्यात येईल. एखाद्या दस्तासाठी भरण्यात येणाऱ्या मुद्रांक शुल्काबाबत सध्या 100 रुपयांच्या शुल्काऐवजी थेट एक हजार रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments